जिल्हा
गायत्रीदेवी अग्रवाल यांचे निधन
देसाईगंज :- शहरातील जेष्ठ महिला नागरिक गायत्रीदेवी जगदीशप्रसाद अग्रवाल यांचे 11 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास वृध्दपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 95 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर वैनगंगा नदीघाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंड, पतवंड, जावई असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. गायत्रीदेवी या अजय अग्रवाल व माया अग्रवाल यांच्या मातोश्री होत.