जिल्हा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) एकहाती सत्ता हस्तगत करावी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम यांचे आवाहन

AVB NEWS अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक शुक्रवारी अहेरीतील राजवाड्यात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, तर मंचावर किष्किंदराव बाबा आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य रामेश्वरराव बाबा आत्राम, नारायणराव बाबा आत्राम, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पुष्पा अलोणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना तनुश्री आत्राम यांनी पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच एकजुटीने सर्वांनी कामाला लागून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) एकहाती सत्ता हस्तगत करावी, असे आवाहन करत आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या विधायक कार्यावर प्रकाश टाकला.

आढावा बैठकीचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्षपदी प्रणाली दुर्गे यांची, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नागेपल्ली शहराध्यक्षपदी अश्विनी शेडके आणि आलापल्ली शहराध्यक्षपदी वैष्णवी येरबतनवार यांची नियुक्ती करून तनुश्री आत्राम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अहेरी तालुकाध्यक्षपदी भाग्यश्री बेझलवार यांची तर राष्ट्रवादी महिला अहेरी शहराध्यक्षपदी श्रीशा कुडकावार, आलापल्ली शहराध्यक्षपदी सोनाली पांढरे यांची निवड करून त्यांनाही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार यांनी, तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवती बहुसंख्येने उपस्थित होत्या.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.