जिल्हा

गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यांनी जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटके व साहित्य केले जप्त  * नक्षल सप्ताहादरम्यान बंगाडी हद्दीत पोलीस दलाची यशस्वी कारवाई

AVB NEWS गडचिरोली :-  जिल्ह्यातील माओवाद आता संपूष्टात आला असून, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ देखील जवळजवळ संपूष्टात आली आहे. सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराज्यीय सिमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हेे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये लपवून ठेवले जात असे. त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करुन आणण्यास केला जात होता. या विरोधात  23 मे, 27 मे व 27 जून 2026 रोजी केलेल्या कारवाईसोबतच1 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस व सिआरपीएफच्या जवानांना यश आले आहे.

गोपनिय माहितीच्या आधारे माओवाद्यांनी महाराष्ट्र – छत्तीसगड सिमेवरील  कुमनार जंगल परिसरात मोठ¬ा प्रमाणावर अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाल्याने 31 जूलै  रोजी पोलीस अधीक्षक, एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक प्राणहिता येथील 04 तुकड्या, बिडीडीएसचे 01 पथक व सिआरपीएफचे पथक शोध अभियान राबविणे कामी रवाना करण्यात आले होते. 1 ऑगस्ट रोजी सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथकांकडून घेरा घालुन बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता सदर ठिकाणावरुन 1) 01 नग एस.एल.आर. रायफल, 2) 01 नग .303 रायफल, 3) 07 नग 12 बोअर रायफल, 4) 03 नग सिंगल शॉट रायफल, 5) 02 नग बिजीएल लॉन्चर्स, 6) 03 नग एस. एल. आर. मॅगझिन, 7) 01 नग आय. ई. डी. स्फोटक, 8) 02 नग बॅटरी असे इ. माओवादी साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरुन मिळालेले सर्व माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, एम. रमेश यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. हर्षवर्धन बि. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. सुनिल उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक व इंट सेल तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक,एम. रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.