देशोन्नतीच्या ‘मनस्विनीं’चा श्रावणी महोत्सव 23 ऑगस्टला * महोत्सवात रेट्रो सोलो डाॅन्स व विठ्ठल रूखमाई थिम गृप डाॅन्स राहणार आकर्षणाचे केंद्र * 15 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ मंचच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात ‘श्रावणी महोत्सवाचेे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून मनस्विनी मंचच्या महिला सदस्यांना आापल्या कलागुणांची उधळण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी सदस्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन मनस्विनी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छूक असलेल्या महिलांना महोत्सवात सहभाग घ्यावयाचा असेल तर त्यांनी मनस्विीनीचे सदस्य होउुन सहभाग घेता येणार आहे. त्याचबरोबर मनस्विनी पुरवणी मध्ये उत्कृष्ठ लिखाण करणार्या मनस्विनींचा सत्कार करण्यात येणार आहे.
श्रावणी महोत्सवात रेट्रो सोलो डाॅन्स व विठ्ठल रूखमाई थिम गृप डाॅन्स राहणार आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. रेटो सोलो डाॅन्स स्पर्धेचे नोंदणी शुल्क 200 रूपये असून प्रथम पारितोषीक 3001 रूपये, द्वितीय पारितोषीक 2001 रूपये आणि तृतीय पारितोषीक 1001 रूपये राहील. विठ्ठल रूखमाई थिम गृप् डाॅन्स स्पर्धेचे नोंदणी शुल्क 500 रूपये असून प्रथम पारितोषीक 5001 रूपये, द्वितीय पारितोषीक 3001 रूपये आणि तृतीय पारितोषीक 2001 रूपये राहील.
नोंदणीसाठी मनस्विनी मंचच्या सुलभा धामोडे 766 234408 , प्रा. संध्या येलेकर 9552894631 , प्रा. सुनिता साळवे 9423122934, प्रा. विना जंबेवार 9422709000, रजनी कुंभारे 9403820408 , प्रा. विजया मने 8421734434 , शिल्पा गुडेवार 9422994555, स्मिता गभणे 7774925928, गायत्री सोमनकर 7588442416, डाॅ. दिप्ती वैद्य 9420853138, अरूणा गोहणे 9404127172, मनिशा महात्मे 9403204779 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन दैनिक देशोन्नतीच्या वतीने करण्यात आले आहे.