जिल्हा

तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वात देसाईगंज तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसला नवी उभारी  * , राष्ट्रवादी युवती काँग्रेसची संघटना प्रत्येक गावात अधिक सक्षम करणे ही काळाची गरज

AVB NEWS देसाईगंज (वडसा) :-  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संघटन विस्ताराला नवी गती देण्याच्या उद्देशाने देसाईगंज येथे पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य  तनुश्री  धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नम्रता मस्के यांची देसाईगंज तालुकाध्यक्ष, तर प्रियंका सिडाम यांची देसाईगंज शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र देऊन दोघींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना तनुश्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाल्या की, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची संघटना प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्ष सुशिक्षित, अभ्यासू आणि समाजकार्यात सक्रिय युवक-युवतींना संधी देईल. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, महिलांच्या नेतृत्वामुळेच समाज आणि राजकारणात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून नव्या पिढीतील युवतींना सक्षम नेतृत्व देणे, त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय करणे आणि पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे हा पक्षाचा संकल्प आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवतींची भूमिका निर्णायक राहणार असून, प्रत्येक कार्यकर्तीने जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा सभापती पिंकू बावणे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदू नरोटे, प्रदेश सचिव युनिस  शेख, युवक प्रदेश सचिव रिंकू पापडकर, जिल्हा उपाध्यक्ष जेसा मोटवानी, जिल्हा संघटक सचिव कपिल बागडे, शहराध्यक्ष हरीश मोठवानी फाहीम काजी, शैलेश पोटवार, कोरेगावच्या सरपंच ममताताई, गीता  नाकाडे, सुनील चिंचोळकर, अमित सलामे, मयूर नागलवाडे, तेजस मरसकोल्हे, अमन गुप्ता, प्रमोद दोनाळकर, सहारे मॅडम तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.