अखेर कार्यकारी अभियंता साखरवाडे यांची बदली *** छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांच्या आंदोलनाची दखल

AVB NEWS गडचिरोली :- येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत त्यांची गडचिरोली जिल्हयातून बदली करण्यात यावी, अशी मागणी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांनी रेटून धरली होती. त्यांसाठी त्यांनी विविध आंदोलने करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आले असून शासनाने अभियंता साखरवाडे यांची नागपूर येथे बदली केली आहे.
कार्यकारी अभियंता साखरवाडे यांची गडचिरोलीतून बदंली करून अधीक्षक अभियंता, नगर परिषद प्रशासन संचालनालय, विभागीय कार्यालय नागपूर येथील रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद कात्रटवार यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करीत शासकीय कामकाजात पारदर्शकता राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 मधील कामांची योग्य ती चौकशी होण्याची गरज असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.