जिल्हा

उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा  * मेळाव्याला मोठया उपस्थित राहण्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांचे आवाहन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा उद्या सोमवार १३ जुलै  दुपारी १ वाजता चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्याला जिल्हयातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्टवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी केले आहे.

मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, प्रदेश सचिव ऋषीकांत पापडकर, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, जेष्ठ नेते जगदीश रालबंडीवार, नजुदीन काझी, चंदू किरंगे, कपील बागडे, माजी जि.प.अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार, प्रदेश संघटन सचिव लौकीक भिवापूरे, जेष्ठ नेते अब्दूल जमिर हकीम, दादाजी चुधरी, राहुल नैताम, जेष्ठ महिला नेत्या कल्पना तिजारे, माजी सभापती नाना नाकाडे, प्रदेश संघटन सचिव श्रीनिवास गोडसेलवार, इरफान पठाण, माजी जि.प.अध्यक्ष समय्या पसूला , योगेश नांदगाये, श्रीकृष्ण अर्जुनकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्यात माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात शेतकरी, शेतमजूर, महिला, बेरोजगार युवक युवतींना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ व निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूकीसाठी इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मेळाव्याला जिल्हयातील राष्टवादी कॉंग्रेसचे समस्त पदाधिकारी, विविध सेलचे नेते व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी केले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.