जिल्हा

सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ येथील भ्रष्टाचाराची चौकशी म्हणजे चोरांच्या हातात तिजोरीची चाबी सोपविण्याचा प्रकार !  * छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांचा आरोप  * चौकशी समितीवर घेतला आक्षेप *त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशीची केली मागणी

AVB NEWS गडचिरोली  :- सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी म्हणजे चोरांच्या हातात तिजोरीची चाबी सोपवून बांधकाम विभागातील गैरप्रकार दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांनी केला आहे. अरविंद कात्रटवार यांनी प्रकरणाच्या चौकशीवरच आक्षेप घेतला असून नाडेकल पुल बांधकाम प्रकरणात प्रत्यक्षात सहभाग असलेल्या  कार्यकारी अभियंत्याकडेच प्रकरणाच्या चौकशी जबाबदारी सोपविणे म्हणजे भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. जर का चौकशीतून भ्रष्टाचाराचा भांडाफोड न झाल्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अरविंद कात्रटवार यांनी दिला आहे. प्रकरणाची पारदर्शकरित्या चौकशी होण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही अरविंद कात्रटवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अरविंद  कात्रटवार यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे केली होती त्याअनुषंगाने सहाय्यक मुख्य अभियंता निशा धाबेकर यांनी गडचिरोली येथील अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांना पत्र पाठवून योग्य ती चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शकरित्या चौकशी होणे अपेक्षीत आहे. परंतू अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी नाडेकल निकृष्ट पुल बांधकाम प्रकरणात सहभागी असलेल्या अविनाश मोरे या अभियंत्याकडेच चौकशी सोपविणे म्हणजे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांनी केला आहे

कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर बांधण्यात आलेला कोटयावधीचा पुल रहदारी सुरू होण्यापुर्वी कोसळला. या पुल बांधकामाची पाहणी केली असता पुलाचे निकृष्ट काम करून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यामध्ये कंत्राटदारापासून शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता हे दोषी आहेत.

2025 – 26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती व पुल दुरूस्तीच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला असून कामे न करताच बिले काढण्यात आली आहे. तसेच मागील 3 वर्षात तब्बल 5 हजार कामांच्या निविदा नियबाहय रित्या काढण्यात आल्या असून सदर कामे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी केवळ मजूर सहकारी सहकारी संस्थांना 20 टक्क्याने विकली आहेत . तसेच विविध निधीतून करण्यात आलेल्या कामांमध्ये मध्ये सुध्दा मोठा गैरव्यवहार करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची पारदर्शकरित्या चौकशी होणे अपेक्षीत आहे.

त्यासाठी अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी त्रयस्थ यंत्रणेमार्फत तथा इतर विभागाच्या वरिष्ठ अभियंतामार्फत चौकशी समिती नेमणे आवश्यक होते. परंतू त्यांनी तसे न करता पुर्वी ज्या विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. त्याच  अभियंत्यावर चौकशीची जबाबदारी सोपविणे आणि थातूर मातूर चौकशी करून कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांना कारवाईपासून वाचविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांनी केला आहे.

कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने विविध आंदोलन करण्यात आले. सहपालकमंत्री मा. ना. आशीषजी जैस्वाल साहेब यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती. कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला एकाच विभागात तीन वर्षापेक्षा अधिक काळ सेवा देता येत नाही. परंतू कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे मागील 8 वर्षापासून गडचिरोली या एकाच विभागात ठाण मांडून बसले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे केवळ क्रमांक बदलले आहेत, असेही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्पष्ट केले आहे. जर का थातूर मातूर चौकशी करून कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांची पाठराखण केल्यास उच्च न्यायालयात धाव घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अरविंद कात्रटवार यांनी दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोली मधील गैरप्रकार प्रकरणात अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे आणि त्यांची गडचिरोली जिल्हयातून हक्कालपटी करण्यात यावी तसेच नाडेकल येथील कोसळलेल्या निकृष्ट पुल बांधकाम प्रकरणात दोषींकडून शासकीय निधीची वसुली करण्यात यावी अशी मागणी अरविंद  कात्रटवार यांनी केली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.