जिल्हा

मंदिर म्हणजे श्रद्धा संस्कृती आणि एकात्मतेचे प्रतीक…!  * छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन  * मौशीखांब येथे हनुमान मंदिराच्या कळस बांधकामासाठी  दिली आर्थिक मदत

AVB NEWS गडचिरोली :- मंदिर हे केवळ विटा दगडांची वास्तू नाही तर ते मनाला शांतता आणि ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती देणारे ठिकाण आहे. परमेश्वराप्रती श्रध्दा असावी अंधश्रध्दा नाही. देवाच्या दरबारात श्रीमंती किंवा गरिबी पाहिली जात नाही. तिथे फक्त मनाची खरी भक्ती आणि शुद्ध भाव महत्त्वाचा असतो . मंदिर हे श्रद्धा संस्कृती आणि एकात्मतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांनी केले.

गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौशीखांब येथे देवस्थान समितीच्या वतीने हनुमान मंदिराच्या कळसाचे बांधकाम हाती घेतले आहे. अरविंद कात्रटवार यांनी हनुमान मंदिराच्या कळस बांधकामांसाठी आर्थिक मदत देऊन पुण्यकार्यात हातभार लावला आणि सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले.त्याबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले की आजच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि धावपळीच्या काळात शहरी भागात सण उत्सवाचे महत्व कमी होत असले तरी ग्रामीण भागात प्रत्येक सण उत्सव आणि पिढयानापिढया सुरू असलेल्या जुन्या धार्मिक विधी उत्सवाचे महत्व कायम आहे. धार्मिक उत्सवामुळे गावातील नागरिकांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होते. ग्रामीण भागातील नागरिकांमुळेचे भारतीय संस्कृतीची मुळ बिजे टिकून आहे आहेत.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गावाच्या विकासात लोकसहभाग महत्वाचा आहे गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहीजे. शासनाच्या योजना गावांपर्यंत पोहचल्या पाहिजे यासाठी .विविध आंदोलन मोर्चे काढून या क्षेत्रातील रस्ते, आरोग्य, शिक्षण , पाणी यासह अनेक समस्या सोडविल्या. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावांचा आणि गावातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे हे आपले ध्येय आहे. असे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, विनोद चापले, यादव चौधरी, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, जगण चापले, यादव चौधरी, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर, विजय मत्ते, बालाजी चापले, भवन चापले, पूनम झंझाळ, निखिल कुढवे, विकी वाडणकर, विकास ठाकरे, राहुल ठाकरे, साहिल कोहपरे, रोहित चणेकार, चैतन्य मेश्राम, ढिसू ढवळे, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, सुधाकर ढवळे, भूषण गुरुकार, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसनशिले, दीपक कोसनशिले, प्रशांत मडावी, मंगल भरणे, मोहित, अनुज कुमिटी, प्रकाश भजभुजे, सूरज वाघाडे, रुपेश ठाकरे, मोहित पेंदाम, जितेंद्र वाघमारे, समीर ठाकरे उपस्थित होते

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.