ताज्या घडामोडी

जंगली हत्तीने दुचाकीस्वारास चिरडले ! सावली तालुक्यातील सोनापूर गावालगतची घटना

एव्हीबी न्यूज गडचिरोली :-  गेल्या काही वर्षापासून गडचिरोली जिल्हयात व लगतच्या चंद्रपूर जिल्हयातील सावली तालुक्यातील व्याहाड परिसरात जंगली हत्तींनी हैदोस घातला आहे. काल गुरूवार 2 जुलै रोजी कळपातून भरटकलेल्या एका जंगली हत्तीने दुचाकीस्वाराला चिरडून ठार केल्याची घटना व्याहाड जवळील सोनापूर सामदा गावालगत रात्री 7.30 वाजताच्या सुमारास घडली.
अतुल गोहणे ( 52) रा. सोनापूर असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार गोहणे हे आपल्या साथीदारासह दुचाकीने सामदा येथून सोनापूरकडे दुचाकीने येत होते. रस्त्यावर रानटी हत्ती समोर आला. गोहणे यांनी प्रसंगसावधानता राखून दुचाकी रस्त्यावर सोडली आणि आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धाव घेतली. मात्र संतप्त झालेल्या हत्तीने गोहणे यांचा पाठलाग केला आणि चिरडून ठार केले. हत्तीच्या हल्ल्यात गोहणे यांचा नाहक बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून वनविभागाने रानटी हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.