जिल्हा

मौशीखांब येथील महसूल विभागाची अतिक्रमीत जागा पंचशिल बौध्द समाजाला द्या,,! * लोकनेते अरविंद  कात्रटवार यांच्यासह बौध्द समाजबांधवांची मागणी  * जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

AVB NEWS गडचिरोली :-  तालुक्यातील मौशीखांब येथील सर्वें न. 433 मधील महसूल विभागाची जागा पंचशिल बौध्द समाज तथा त्रिरत्न बौध्द महिला मंडळाला सामाजिक कार्यक्रम व समाजपयोगी कामासाठी देण्यात यावी, अशी मागणी बौध्द समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने आज 23 जून रोजी मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

पंचशील बौध्द समाज व त्रिरत्न बौध्द महिला मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, मौशीखांब येथील सर्वे नं. 433 मधील 0.14 हे.आर. जागा महसूल विभागाची असून 70 ते 80 वर्षापासून सदर जागेवर काही बौध्द बांधवांनी अतिक्रमण केले आहे . अतिक्रमणधारकांनी सदर जागा समाजाच्या कामासाठी उपयोगात यावी यासाठी जागेवरील अतिक्रमण काढून स्वेच्छेने जागा मोकळी करून देण्याची तयारी दर्शविली आहे.

मौशीखांब येथील येथील बौध्द बांधव गुण्यागोविंदाने राहतात. समाजाच्या वतीने विविध सण उत्सव उत्साहात साजरे केले जातात. समाजाला समाजपयोगी कार्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे अडचनीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने अतिक्रमीत महसूल विभागाच्या जागेचा ताबा मौशीखांब येथील पंचशील बौध्द समाज, त्रिरत्न बौध्द महिला मंडळाला दिल्यास बौध्द समाज बांधवांना सामाजिक, प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजाच्या विविध कामांसाठी उपयोगात आणता येेईल आणि समाजाला हक्काची जागा उपलब्ध होईल, असेही बौध्द समाजबांधवांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. निवेदन देतांना मौैशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे लोेकनेते अरविंद  कात्रटवार यांच्यासह मौशीखांब येथील बौध्द समाज बांधव उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.