जिल्हा

 कार्यकारी अभियंत्याने नातेवाईकांना दिलेल्या कोटयावधीच्या कामाची चौकशी करा  * डीपीडीसीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांची मागणी  * जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

AVB NEWS गडचिरोली  :- येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून आपल्या नातेवाईक शिवानी रेवतकर यांना नियबाहयरित्या कोटयावधीची दिली असून सदर कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांनी केली आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने आज सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन पाठविण्यात आले.

अरविंद कात्रटवार यांनी निवेदना स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे निकृष्ट पुल बांधकामए रस्ते व पुल दुरूस्तीच्या नावाखाली कामे न करता बिले काढणे,  केवळ मजूर सहकारी संस्थांना 20 टक्के कमिशन घेऊन कोटयावधीची कामे विकणे,  एवढेच नव्हे तर मागील तीन वर्षात 5 हजार ऑफलाईन नियबाहय निविदा काढून कामे विकण्याचा प्रताप कार्यकारी अभियंता साखरवाडे यांनी केला आहे,.  साखरवाडे यांनी एवढयावरच न थांबता सार्वजनिक बांधकाम विभागाला कमाईचे माध्यम समजून नियबाहयरित्या आपल्या नातेवाईकांना कोटयावधीची कामे दिल्याचा प्रकार सुध्दा उजेडात आला आहे

काम वाटप करतांना शासनाने नियम व निकष ठरवून दिले आहेतण् त्यानुसार कामाचे वाटप करणे आवश्यक आहेण् परंतू कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे नियम व निकष डावलून ष्हम करे सो कायदाष् या अविभार्वात हुकूमशाही पध्दतीने कारभार करीत आहेतण् सन 2023. 24 या आर्थिक वर्षात अभियंता साखरवाडे यांनी आपली पुतनी शिवानी रेवतकर यांना कोटयावधीची कामे परस्पररित्या दिलीण् विशेष यातील अनेक कामे केवळ कागदावरच असून कामे न करता बिले काढण्यात आली आहेतण् आजही दुसऱ्यांच्या नावाने कार्यकारी अभियंता साखरवाडे यांची पुतनी शिवानी रेवतकर या ठेकेदारी करीत आहेत त्यांनी केलेल्या कामांमध्ये मोठा गडबड घोटाळा करण्यात आला असून कामाची योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी अरविंद कात्रटवार यांनी केली.

निवेदन देतांना  यादव लोहंबरे, विनोद चापले, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, जगण चापले, यादव चौधरी, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर, विजय मत्ते, बालाजी चापले, भवन चापले, पूनम झंझाळ, निखिल कुढवे, विकी वाडणकर, विकास ठाकरे, राहुल ठाकरे, साहिल कोहपरे, रोहित चणेकार, चैतन्य मेश्राम, ढिसू ढवळे, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, सुधाकर ढवळे, भूषण गुरुकार, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसनशिले, दीपक कोसनशिले, प्रशांत मडावी, मंगल भरणे, मोहित, अनुज कुमिटी, प्रकाश भजभुजे, सूरज वाघाडे, रुपेश ठाकरे, मोहित पेंदाम, जितेंद्र वाघमारे, समीर ठाकरे उपस्थित होते

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.