जिल्हा

गडचिरोलीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियत्याविरोधात रोष !  * जोडे मारो आंदोलन करून अभियंता सुरेश साखरवाडेंच्या निलंबनाची मागणी

AVB NEWS ’’गडचिरोली  : – येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे तसेच त्यांची गडचिरोली जिल्ह्यातून हक्कालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात आज बुधवार 17 जून  रोजी लांजेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 च्या कार्यालय समोर ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. अभियंता साखरवाडे यांच्या पोस्टरला चप्पल जोडे मारून रोष व्यक्त करण्यात आला. साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत वारंवार निवेदन व आंदोलन करूनही कारवाई होत नसल्याने लोकनेते अरविंद  कात्रटवार व आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

अरविंद  कात्रटवार यांनी स्पष्ट केले आहे की कार्यकारी अभियंता साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आणून कारवाईची मागणी करण्यात आली आहे याबाबत जिल्हयाचे सहपालकमंत्री मा. आशिषजी जसस्वाल यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. 25 मे 2026 रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर डफरे बजाओ आंदोलन 3 जून 2026 रोजी कार्यकारी अभियंता कार्यालया समोर अभियंता साखरवाडे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलन तसेच 9 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले परंतू अद्याप साखरवाडे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावरून प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचारी अभियंता साखरवाडे यांची पाठराखण करीत आहे, असा आरोपही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी करीत साखरवाडे शासनाचे ‘जावई’ आहेत काय ? असा सवालही उपस्थित केला.

कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवरील पाच कोटीचा पूल वाहतूकीसाठी खुला होण्यापुर्वीच कोसळला. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे. तसेच सप 25 – 26 या आर्थिक वर्षात ग्रामीण रस्ते व पुल दुरूस्तीच्या 50 कोटीच्या कामांमध्ये अनियमीतता तसेच प्रत्यक्ष काम न करताच देयक काढण्यात आले. तसेच मागील तीन 5 हजार कामांच्या नियबाहय निविदा काढण्यात आल्याचा आरोप अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केला आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याने नाईलाजास्तव विविध आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागत असल्याचे अरविंदभाऊ  कात्रटवार स्पष्ट करीत भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कार्यकारी अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांचे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी चांगले वर्तन नाही. साखरवाडे हे कंत्राटदार व कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर व्यक्तीसमोर महिला कर्मचाऱ्यांना दुहेरी (लज्जास्पद) शब्दात बोलतात. शासकीय कार्यालयात वरिष्ठांकडून महिला कर्मचाऱ्यांना असभ्य वागणूक देणे हा गुन्हा आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचीभावना निर्माण झाली आहे

अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे आणि त्यांची गडचिरोली जिल्हयातून हक्कालपटी करण्यात यावी तसेच नाडेकल येथील कोसळलेल्या निकृष्ट पुल बांधकाम प्रकरणाची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी आणि शासकीय निधीची वसुली करण्यात यावी अशी मागणी अरविंदभाऊ  कात्रटवार रेटून धरली. शासन व प्रशासन अभियंता साखरवाडे यांच्यावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचंे लक्ष लागले आहे.

याप्रसंगी यादव  लोहंबरे, विनोद चापले, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, जगण चापले, यादव चौधरी, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर, विजय मत्ते, बालाजी चापले, भवन चापले, पूनम झंझाळ, निखिल कुढवे, विकी वाडणकर, विकास ठाकरे, राहुल ठाकरे, साहिल कोहपरे, रोहित चणेकार, चैतन्य मेश्राम, ढिसू ढवळे, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, सुधाकर ढवळे, भूषण गुरुकार, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसनशिले, दीपक कोसनशिले, प्रशांत मडावी, मंगल भरणे, मोहित, Anuj कुमिटी, प्रकाश भजभुजे, सूरज वाघाडे, रुपेश ठाकरे, मोहित पेंदाम, जितेंद्र वाघमारे, समीर ठाकरे, ढेकलु वाघमारे, आबाजी ठाकरे, आशिक उईके, प्रांजल कोलते, सौरव कोलते, रुपेश कोलते, साहिल कोलते, प्रदीप सोरते, सोनू सोरते, फाल्गुन समर्थ, महेश भोयर, अजित समर्थ, मिलिंद आत्राम, मंथन परचाके, अण्णाजी आत्राम, नैतिक भजभुजे, रोहित आत्राम, समीर आत्राम, गुरुदेव सूर्यवंशी, अरुण भोयर, रमेश भजभुजे, राजू डाहाले, चुडाराम राऊत, लुमाजी मुंघाटे, भगवान चणेकार, देकलु वाघमारे, अमित मेश्राम, महेश लाकडे, दीपक लाडे, राहुल सावरकर, विश्वनाथ भनारकर, कैलास लाडे, अमोल भैसारे, हिरो हर्षे, नयन भोयर, मधुकर उंदिरवाडे, बळीराम बळोशे, कौशिक ढोलणे, प्रकाश ढोलणे, संगम जांभूळकर, समीर ढोलणे, समीर चौधरी, कुंदन वाकडे, कुणाल चूधरी, शेखर दोडके, माऊली श्रीरामे, देवेंद्र मुळे, अशोक राखडे, दिलीप वलादी, अमित हुलके, सारंग सेलोटे, रणजीत वलादे, नंदू भाऊ शेडमाके, कुमोद खेवले, दीपक सेलोटे, गणेश बाबनवाडे, मधुकर बावणवाडे, गंधर्व वलादे, गजानन मडावी, दीपक कोहरे, नामदेव भुसारी मनोहर भोयर, देविदास बांबोडे, विनोद डोंगरे, पुरुषोत्तम पोवणकर, केशव बांबोडे, हिरामनजी आवारी, अरविंद भुसारी उपस्थित

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.