अभियंता सुरेश साखरवाडे च्या हक्कालपट्टीसाठी काढलेल्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलनाने प्रशासन हादरले ! * अभियंता सुरेश साखरवाडे शासनाचे जावई आहेत काय, लोकनेतेअरविंद कात्रटवार यांचा सवाल * अरविंद कात्रटवार यांनी केली साखरवाडे वर कारवाईची जोरदार मागणी

AVB NEWS गडचिरोली :- येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे तसेच त्यांची गडचिरोली जिल्ह्यातून हक्कालपट्टी करण्यात यावीए या प्रमुख मागणीसाठी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात बुधवार 3 जून 2026 रोजी लाझेंडा परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 च्या कार्यालया समोर अभियंता साखरवाडे यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलन करण्यात आले. या आगळयावेगळया आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून तर घेतलेच. मात्र आंदोलन पाहून प्रशासन चांगलेच हादरले.
भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, त्यांची गडचिरोली जिल्हयातून हक्कालपट्टी झालीच पाहिजे, साखरवाडेंना हटवा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला वाचवा, अशा घोषणा लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार व आंदोलकत्यांनी देऊन बांधकाम विभागाचा परिसर दणाणून सोडला. अभियंता साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणूनही त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर साखरवाडे हे शासनाचे ‘जावई’ आहेत काय, असा सवाल अरविंद कात्रटवार यांनी उपस्थित करून शासन व प्रशासनावर जोरदार हल्ला चढविला.
कार्यकारी अभियंता श्री साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आणून कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसेच 25 मे 2026 रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर ष्डफरे बजाओ आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलेण् परंतू अद्यापही झोपी गेलेल्या शासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही त्यामुळे प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलन करण्याची वेळ आल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्पष्ट केले.
कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर अंदाजे 5 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेला पुल रहदारी सुरू होण्यापुर्वी कोसळला. या पुल बांधकामाची पाहणी केली असता पुलाचे निकृष्ट काम करून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी 2025 . 26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती व पुल दुरूस्तीच्या 50 कोटीच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला असून कामे न करताच बिले काढण्यात आली आहेण् तसेच मागील 3 वर्षात तब्बल 5 हजार कामांच्या निविदा नियबाहय रित्या काढण्यात आल्या असून सदर कामे केवळ मजूर सहकारी सहकारी संस्थांना 20 टक्क्याने विकण्यात आल्याचा आरोपही कात्रटवार यांनी केला आहे
कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांचे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी चांगले वर्तन नाही साखरवाडे हे कंत्राटदार व कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर व्यक्तीसमोर महिला कर्मचाऱ्यांना दुहेरी ;लज्जास्पदद्ध शब्दात बोलतातण् शासकीय कार्यालयात वरिष्ठांकडून महिला कर्मचार्यांना असभ्य वागणूक देणे हा गुन्हा आहे या प्रकरणाची एकादया महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्हयात रस्ते व पुलाची निकृष्ट कामे करून भ्रष्टाचाराचा कळस गाठणारे अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे आणि त्यांची गडचिरोली जिल्हयातून हक्कालपटी करण्यात यावी तसेच नाडेकल येथील कोसळलेल्या निकृष्ट पुल बांधकाम प्रकरणाची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी आणि शासकीय निधीची वसुली करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांनी दिला आहे
याप्रसंगी यादव लोहंबरे, विनोद चापले, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, जगण चापले, यादव चौधरी, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर, विजय मत्ते, बालाजी चापले, भवन चापले, पूनम झंझाळ, निखिल कुढवे, विकी वाडणकर, विकास ठाकरे, राहुल ठाकरे, साहिल कोहपरे, रोहित चणेकार, चैतन्य मेश्राम, ढिसू ढवळे, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, सुधाकर ढवळे, भूषण गुरुकार, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसनशिले, दीपक कोसनशिले, प्रशांत मडावी, मंगल भरणे, मोहित, Anuj कुमिटी, प्रकाश भजभुजे, सूरज वाघाडे, रुपेश ठाकरे, मोहित पेंदाम, जितेंद्र वाघमारे, समीर ठाकरे, ढेकलु वाघमारे, आबाजी ठाकरे, आशिक उईके, प्रांजल कोलते, सौरव कोलते, रुपेश कोलते, साहिल कोलते, प्रदीप सोरते, सोनू सोरते, फाल्गुन समर्थ, महेश भोयर, अजित समर्थ, मिलिंद आत्राम, मंथन परचाके, अण्णाजी आत्राम, नैतिक भजभुजे, रोहित आत्राम, समीर आत्राम, गुरुदेव सूर्यवंशी, अरुण भोयर, रमेश भजभुजे, राजू डाहाले, चुडाराम राऊत, लुमाजी मुंघाटे, भगवान चणेकार, देकलु वाघमारे, अमित मेश्राम, महेश लाकडे, दीपक लाडे, राहुल सावरकर, विश्वनाथ भनारकर, कैलास लाडे, अमोल भैसारे, हिरो हर्षे, नयन भोयर, मधुकर उंदिरवाडे, बळीराम बळोशे, कौशिक ढोलणे, प्रकाश ढोलणे, संगम जांभूळकर, समीर ढोलणे, समीर चौधरी, कुंदन वाकडे, कुणाल चूधरी, शेखर दोडके, माऊली श्रीरामे, देवेंद्र मुळे, अशोक राखडे, दिलीप वलादी, अमित हुलके, सारंग सेलोटे, रणजीत वलादे, नंदू भाऊ शेडमाके, कुमोद खेवले, दीपक सेलोटे, गणेश बाबनवाडे, मधुकर बावणवाडे, गंधर्व वलादे, गजानन मडावी, दीपक कोहरे, नामदेव भुसारी मनोहर भोयर, देविदास बांबोडे, विनोद डोंगरे, पुरुषोत्तम पोवणकर, केशव बांबोडे, हिरामनजी आवारी, अरविंद भुसारी