अभियंता साखरवाडेच्या हक्कालपट्टीसाठी अरविंद कात्रटवारांनी ‘डफरे बजाओ’ आंदोलनातून शासनाला केले जागे !कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

AVB NEWS गडचिरोली :- येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे तसेच त्यांची गडचिरोली जिल्हयातून हक्कालपट्टी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात 25 मे 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर ‘डफरे बजाओ’ आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले . गडचिरोली जिल्हयात रस्ते व पुल दुरूस्तीची बोगस, नियमबाहय कामे आणि निकृष्ट पूल बांधकाम करणाऱ्याला अभय का ? असा सवाल लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांनी उपस्थित करीत शासन व प्रशासनावर जोरदार निशाना साधला
डफरे बजाओ आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई झालीचे पाहिजे, त्यांची जिल्हयातून हक्कालपट्टी झालीच पाहिजे असा घोषणांनी कॉम्प्लेक्स परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह अधीक्षक अभियंता यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन देऊन कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर तातडीने कारवाईची मागणी रेटून धरली.
अरविंद कात्रटवार यांनी स्पष्ट केले आहे की कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर बांधण्यात आलेला पुल रहदारी सुरू होण्यापुर्वी कोसळला. या पुल बांधकामाची पाहणी केली असता पुलाचे निकृष्ट काम करून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे त्याचबरोबर कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी 2025 – 26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती व पुल दुरूस्तीच्या 50 कोटीच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला असून कामे न करताच बिले काढण्यात आली आहे. तसेच मागील 3 वर्षात तब्बल 5 हजार कामांच्या निविदा नियबाहय रित्या काढयात आल्या असून सदर कामे केवळ मजूर सहकारी सहकारी संस्थांना 20 टक्क्याने विकण्यात आल्याचा आरोपही कात्रटवार यांनी केला आहे.
गडचिरोली जिल्हयात रस्ते व पुलाची निकृष्ट कामे करून भ्रष्टाचाराचा कळस गाठणारे अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे आणि त्यांची गडचिरोली जिल्हयातून हक्कालपटी करण्यात यावी तसेच नाडेकल येथील कोसळलेल्या निकृष्ट पुल बांधकाम प्रकरणाची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी आणि शासकीय निधीची वसुली करण्यात यावी अशी मागणी ‘डफरी बजाओ’ आंदोलनातून लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केली आहे अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही अरविंद कात्रटवार यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, विनोद चापले, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, जगण चापले, यादव चौधरी, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर, विजय मत्ते, बालाजी चापले, भवन चापले, पूनम झंझाळ, निखिल कुढवे, विकी वाडणकर, विकास ठाकरे, राहुल ठाकरे, साहिल कोहपरे, रोहित चणेकार, चैतन्य मेश्राम, ढिसू ढवळे, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, सुधाकर ढवळे, भूषण गुरुकार, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसनशिले, दीपक कोसनशिले, प्रशांत मडावी, मंगल भरणे, मोहित, Anuj कुमिटी, प्रकाश भजभुजे, सूरज वाघाडे, रुपेश ठाकरे, मोहित पेंदाम, जितेंद्र वाघमारे, समीर ठाकरे, ढेकलु वाघमारे, आबाजी ठाकरे, आशिक उईके, प्रांजल कोलते, सौरव कोलते, रुपेश कोलते, साहिल कोलते, प्रदीप सोरते, सोनू सोरते, फाल्गुन समर्थ, महेश भोयर, अजित समर्थ, मिलिंद आत्राम, मंथन परचाके, अण्णाजी आत्राम, नैतिक भजभुजे, रोहित आत्राम, समीर आत्राम, गुरुदेव सूर्यवंशी, अरुण भोयर, रमेश भजभुजे, राजू डाहाले, चुडाराम राऊत, लुमाजी मुंघाटे, भगवान चणेकार, देकलु वाघमारे, अमित मेश्राम, महेश लाकडे, दीपक लाडे, राहुल सावरकर, विश्वनाथ भनारकर, कैलास लाडे, अमोल भैसारे, हिरो हर्षे, नयन भोयर, मधुकर उंदिरवाडे, बळीराम बळोशे, कौशिक ढोलणे, प्रकाश ढोलणे, संगम जांभूळकर, समीर ढोलणे, समीर चौधरी, कुंदन वाकडे, कुणाल चूधरी, शेखर दोडके, माऊली श्रीरामे, देवेंद्र मुळे, अशोक राखडे, दिलीप वलादी, अमित हुलके, सारंग सेलोटे, रणजीत वलादे, नंदू भाऊ शेडमाके, कुमोद खेवले, दीपक सेलोटे, गणेश बाबनवाडे, मधुकर बावणवाडे, गंधर्व वलादे, गजानन मडावी, दीपक कोहरे, नामदेव भुसारी मनोहर भोयर, देविदास बांबोडे, विनोद डोंगरे, पुरुषोत्तम पोवणकर, केशव बांबोडे, हिरामनजी आवारी, अरविंद भुसारी