विशेष

पोलीस शिपाई पदी निवड झालेल्या उमेदवारांनी ‘खाकीवर्दी’ चा उपयोग जनकल्याणासाठी करावा… ! निवड झालेल्या उमेदवारांचा लोकनेते अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन सत्कार *मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील तब्बल १० उमेदवारांची पोलीस शिपाईपदी निवड

AVB NEWS गडचिरोली :- पोलीस खाकीवर्दी म्हणजे मोठी जबाबदारी असून ती निष्ठेला आणि सेवाभावाला समर्पीत आहे. खाकीवर्दीत माणूस नाही, तर एक कर्तव्य उभं असतं. जनतेची रक्षा करून कायदा व सुव्यवस्था सांभाळणे प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम आहे. मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील तब्बल १० उमेदवारांची पोलीस शिपाईपदी निवड होणे कौतुकास्पद बाब आहे. उमेदवारांनी आपल्या वर्दीची प्रतिमा उंचावून त्याचा उपयोग जनकल्याणासाठी करून पोलीस प्रशासनाचा नावलौकीक वाढवावा, असे प्रतिपादन लोकनेते अरविंदकात्रटवार यांनी केले.

गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील तब्बल १० मयुरी चौधरी (आंबेशिवनी टोली), कांचन चंद्र गिऱ्हे (आंबेशिवनी टोली), पूजा सावसागडे ( अमीर्झा टोली), वैष्णवी दिलीप जैस्वाल (गिलगाव), गायत्री खाटे (अमीर्झा टोली), धीरज खेवले (मरेगाव), राहुल नीलेकार (अमीर्झा), अंकुश टेंगे (भिकारमोशी), नयन टेकाम (मरेगाव), प्रतीक धानफुले (अमीर्झा) युवक युवतींची पोलीस शिपाईपदी निवड झाली आहे.पोलीस भरतीत या क्षेत्राचा नावलौकीक वाढविलेल्याने अरविंद कात्रटवार व मित्र परिवाराने निवड झालेल्या उमेदवारांचे कौतूक करीत उमेदवारांच्या घरी जाउुन त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला व आणि त्यांच्या सेवा कार्याला शुभेच्छा दिल्या.

अरविंद कात्रटवार म्हणाले की यश सहजासहजी मिळत नसते. मौशीखांब -मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील युवक युवतींनी कठोर मेहनत घेऊन शिपाईपदाची नोकरी प्राप्त केली आहे. ही या क्षेत्रातील जनतेसाठी गौरवाची बाब आहे. या क्षेत्रातील उच्चशिक्षीत युवक युवतींनी केवळ पोलीस भरतीच नव्हे तर विविध विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची सुध्दा तयारी करून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली पाहीजे. मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील उमेदवारांची पोलीस शिपाईपदी झालेली निवड ही भविष्यात नोकरीचे ‘स्वप्न’ बाळगलेल्या युवक युवतींसाठी प्रेरणादायी आहे. या क्षेत्रातील गोरगरीब हुशार विद्याथ्र्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीचा मनात न्यूनगंड न बाळगता कठोर मेहनत व जिद्द चिकाटीने आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे. विद्याथ्र्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे अरविंद कात्रटवार म्हणाले.

याप्रसंगी यादव लोहंबरे, गोपाल मोंगरकर, दीपक लाडे, विनोद चापले प्रशांत ठाकूर, जीवन कुरुडकर, अमित चौधरी, विश्वनाथ भानारकर, कैलास लाडे, विलास ढोमणे, निकेश लोहंबरे, दिलीप वलादे, राजेंद्र मेश्राम, अमित हुलके, अंकुश ठेंगे, प्रकाश भजभुजे उपस्थित होते

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.