जिल्हा

“अनसंग दैनंदिन हिरो सन्मान” कार्यक्रमात  सुचिता धकाते यांचा गौरव

AVB NEWS गडचिरोली प्रतिनिधी :आध्यात्मिक गुरू प.पू. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या जयंतीनिमित्त तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45 वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त आयोजित “अनसंग दैनंदिन हिरो सन्मान” हा प्रेरणादायी कार्यक्रम चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुचिता उदय धकाते यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर जोरगेवार, सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, वसंतराव थोटे, चंद्रकांत गुंडावार तसेच महाराष्ट्र अपेक्स मेंबर विश्वंभर कुमार यांची उपस्थिती लाभली.

यावेळी समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यात डॉ. बालमुकुंद पालीवाल, अनिकेत दुर्गे, सौ. सुचिता उदय धकाते (गडचिरोली), सौ. रूपाली पापडकर, डॉ. प्रेरणा चांडक आणि तानाजी बायस्कर यांचा समावेश होता.

तसेच व्यवसाय व समाजसेवा क्षेत्रात सुचिता उदय धकाते, जयंत गजानन हटवार, डॉ. संजय श्रीधरराव सुपारे, डॉ. शीतल संजय सुपारे, विश्राम संभाजी होकम व विलासराव शामराव चितमलवार यांना सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात विनय साहित्येंद्र कोवे, डॉ. अनिल नारायणराव निकोडे, नितेश प्रभा प्रमोदराव खडसे, प्रेरणा विजय गेडाम, यशवंत दिवाकर कुरुडकर, रुपाली रुसिकांत पापडकर तसेच युवा अनिकेत दुर्गे यांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी सर्व मान्यवरांनी सन्मानित व्यक्तींच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास माधुरी दहिकर, अमोल दशमुखे, उदय धकाते, ऋषिकेश पापडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.