जेष्ठ समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे निधन

AVB NEWS गडचिरोली :- जेष्ठ समाजसेवक तथा श्री गुरूदेव सेवा मंडळाचे प्रसारक डॉ. शिवनाथजी कुंभारे यांचे आज मंगळवारी सकाळी 11 वाजता गडचिरोली येथील निवासस्थानी वृध्दपकाळाने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी ते 79 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता कठाणी नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि प्रेरणेमुळे अनेकांना दिशा मिळाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार व कार्य सर्वदूर जावे यासाठी त्यांनी श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केला. डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य अडळयाळ टेकडी आणि पदमश्री अण्णा हजारे यांच्या समवेत अनेक वर्ष सेवेचे कार्य केली. त्यांनी वैद्यकीय सेवेसोबत लोककल्याणकारी अभियानात आपल्या आयुष्याची 50 वर्ष दिलीत. अंधश्रध्दा निमुर्लन, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन आदी योगदान दिले.