जिल्हा

महामानवाच्या जयंतीदिनी मौशिखांब मुरमाडी जिल्हापरिषद क्षेत्रातील नारीशक्तीचा वस्त्रभेट देऊन सन्मान* अरविंद कात्रटवार व मित्रपरिवारांचा स्तुत्य उपक्रम

भारतीय समाजाला समतेच्या मार्गावर आणण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य अतुलनीय !  * मौशिखांब मुरमाडी जिल्हापरिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन

AVB NEWS :- दीन, दलित व समाजातील शोषीतांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अरविंद  कात्रटवार व मित्रपरिवारांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचीत्य साधून मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील आंबेशिवनी, आंबेशिवनी टोली, आंबेटोला, अमीर्झा, कळमटोला, टेंभा, मौशिखांब, मुरमाडी, गिलगाव येथे महामानवाच्या जयंतीदिनी (उपासिकांना ) नारीशक्तींचा वस्त्रभेट देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना मौशिखांब मुरमाडी जिल्हापरिषद क्षेत्राचे लोकनेेते अरविंद कात्रटवार म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा महान आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी शिक्षण घेतले. अस्पृश्यता जातीयभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला . विषमतेने भरलेल्या भारतीय समाजाला समता स्वातंत्र्य आणि बंधुतेचा मार्ग दाखवला. त्यांनी दलितांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला. भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जगातील सर्वोत्तम संविधान देशाला दिले.

याप्रसंगी यादव लोहबरे, गोपाल मोगरकर, यादवजी चौधरी, दीपक लाडे, विनोद चापले, प्रशांत ठाकूर, स्वप्नील जुमनाके, दीपक वलादे जीवन कुरुडकर, अमित चौधरी,विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, प्रफुलजी बांबोळे, हेमंतजी मेश्राम, रागिणा डोंगरे, निशाताई बांबोळे व गावकरी उपस्थित होते

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.