संपादकीय

जीडीसीसी बॅंकेच्या अध्यक्षपदी उच्चशिक्षीत ईशा पोरेड्डीवार यांची निवड * पोरेड्डीवारांचे ४० वर्षापासूनचे बॅंकेवरील वर्चस्व अबाधीत कायम

एव्हीबी न्यूज गडचिरोली “- सहकार क्षेत्रात राज्य व देशपातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान उच्चशिक्षीत ईशा प्रंचीत पोरेड्डीवार यांना मिळाला आहे. बॅंकेच्या उपाध्यक्षपदी क्षिरसागर नाकाडे, तर मानद सचिवपदी दीपक निंबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेश म्हणजे सहकार महर्षी अरविंद सा. पोरेड्डीवारांनी योग्य नियोजन व दिर्घ अनुभवाच्या आधारावर २१ संचालकांना अविरोध निवडून आणून आपले अबाधीत वर्चस्व कायम ठेवले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात आज१५ एप्रिल रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव पदाची निवड प्रक्रिया पार पडली. सभेला सर्व संचालकांची हजेरी होती. अध्यक्षपदासाठी ईशा प्रंचीत पोरेड्डीवार, उपाध्यक्षपदासाठी क्षिरसागर नाकाडे, व मानद सचिवपदी पदासाठी दीपक निंबेकर यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे निवड प्रक्रिया बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश चंदेल यांनी जाहीर केले.

नव्या अध्यक्ष ईशा पोरेड्डीवार या सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेडीवार यांच्या स्नुशा व माजी अध्यक्ष प्रंचीत सावकार पोरेड्डीवार यांच्या पत्नी आहेत. निवड सभेला सहकार महर्शी अरविंद सावकार पोरेड्डीवार, नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश सा. पोरेड्डीवार, बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रंचीत पोरेड्डीवार, श्रीहरी भंडारीवार, अनंत साळवे, डॉ. दुर्वेश भोयर, बॅंकेच्या नवनियुक्त संचालक छाया पोरेड्डीवार, निलीमा पोरेड्डीवार यांच्यासह बॅंकेचे संचालक उपस्थित होते. सभेचे संचालन बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार उपस्थित होते. नवनिर्वाचीत संचालक व माजी संचालकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुश्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.