दानधर्मामुळे मानसिक समाधान व सकारात्मक उर्जा मिळते ! * लोकनेते अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन * मौशीखांब येथील हनुमान मंदिराच्या कळस बांधकामाला दिली आर्थिक मदत

AVB NEWS गडचिरोली :- निस्वार्थपणे केलेले दान पुण्यप्राप्तीसमान आहे. धार्मिक कार्यासाठी केलेले दान असो वा गरजवंतांना केलेली मदत असो केलेल्या दानधर्मामुळे मानसिक समाधान, समाजकार्याप्रती गोडी आणि जीवन कार्याप्रती सकारात्मक उर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन मौशिखांब मुरमाडी जिल्हापरिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंद कात्रटवार यांनी केले.
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौशीखांब येथील हनुमान मंदिराच्या कळसाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मंदिराच्या कळस बांधकामासाठी अरविंद कात्रटवार यांनी सेवाभाव जोपासत आर्थिक मदत दिली. अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते बांधकामाचे भुमिपूजन पार पडले. लवकरच हनुमान मंदिराच्या कळसाचे काम पुर्णत्वास येणार असून भाविकांनी कृतघ्नता व्यक्त केली.
अरविंद कात्रटवार म्हणाले की, मंदिर हे श्रध्दा, भक्ती, शांती व ज्ञानाचे केंद्र आहे. मनाला शांती हवी असेल तर परमेश्वराच्या चरणी नतमस्तक झाले पाहिजे. परमेश्वराप्रती श्रध्दा असली पाहिजे अंधश्रध्दा नाही. फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने केलेले कार्य कदापाही व्यर्थ जात नाही. नेहमी सकारात्मकता बाळगूण कर्म केल्यास फलप्राप्ती निश्चित मिळते., असेही अरविंद कात्रटवार म्हणाले.
मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील प्रत्येक गावांचा विकास आणि प्रत्येक समाजघटकांचा विकास झाला पाहिजे हे आपले ध्येय आहे.. या क्षेत्रातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा अधिक बळकट करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्र जिल्हयातील सर्वात प्रगतशिल क्षेत्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न सुरू असून या क्षेत्रातील नागरिकांचे सहकार्य सुध्दा तेवढेच महत्वाचे आहे, असेही अरविंद कात्रटवार म्हणाले.
याप्रसंगी अरविंदभाऊ मित्रपरिवारातील कार्यकर्ते यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर,यादव चौधरी, विनोद चापले, दिपक लाडे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, प्रकाश भजबुजे, अमित हुलके, सुरेश वाघाडे, अमर सोरते,प्रशांत ठाकूर, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, कैलास लाडे, दीपक राऊत, रोशन कोरते, विश्वनाथ भानारकर, जगदीश खेवले, कवडू खेडेकर, आशिष निकुरे, अमोल मेश्राम, मयुर मेश्राम, किशोर म्हशाखेत्री, मोहन ठाकरे, नवनीत मेश्राम, विलास नैताम, दीपक वलादे, जीवन कुरुडकर व गावकरी उपस्थित होते