संपादकीय
जिल्हाभरात ‘जय बजरंगबली’ चा गजर !

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- जिल्हाभरात हनुमान जयंती आनंद व उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकणी ‘जयबरंगबली’ चा निनाद गुंजला. जिल्हाभरात लाखो भाविकांनी हनुमान मंदिरात जाऊन भगवान हनुमानाचे दर्शन घेतले.
गडचिरोली शहरात ठिकठिकाणी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सेमान देवस्थान येथे सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावून दर्शन घेतले. चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालय समोर गोकुळनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून पुजा अर्चा व हनुमान चालीसा वाचन पार पडले. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.