जिल्हा

समाजाच्या जडघडणीत नारिशक्तीचे महत्वपुर्ण योगदान !  * लोकनेते अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन  * अमिर्झा येथे वाल्मीक ऋषी मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्य माताभगीनींसाठी वस्त्रभेट सोहळा

AVB NEWS गडचिरोली :-  महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान आणी कार्य लक्षात घेता नारिशक्तीचे प्रतिक म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस स्त्री-पुरुष समानता, महिला हक्क आणि सक्षमीकरणाबद्दल जागरूकता वाढवतो. महिलांच्या त्याग, समर्पण आणि समाजातील महत्त्वाच्या योगदानाचा गौरव करते. असे प्रतिपादन लोकनेते अरविंद कात्रटवार यांनी केले.

कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करतांना अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले की, स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नाही, तर ती समाजाची खरी शक्ती आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक नात्यांमधून ती प्रेम, त्याग आणि समर्पण यांची शिकवण देते. आजची स्त्री चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित राहिलेली नाही, ती सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. स्त्री-पुरुष समानता निर्माण करणे , महिलांना सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून देणे आणि आजच्या युगात महिला सक्षमीकरणाची गरज आहे. मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल असेही अरविंद कात्रटवार म्हणाले.

याप्रसंगी अरविंदभाऊ मित्रपरिवारातील कार्यकर्ते यादव लोहंबरे, गोपाल मोंगरकर,यादव चौधरी, विनोद चापले, दिपक लाडे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, प्रकाश भजबुजे, अमित हुलके, सुरेश वाघाडे, अमर सोरते,प्रशांत ठाकूर, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, कैलास लाडे, दीपक राऊत, रोशन कोरते, विश्वनाथ भानारकर, जगदीश खेवले, कवडू खेडेकर, आशिष निकुरे, अमोल मेश्राम, मयुर मेश्राम, किशोर म्हशाखेत्री, मोहन ठाकरे, नवनीत मेश्राम, विलास नैताम, दीपक वलादे, जीवन कुरुडकर व गावकरी उपस्थित होते

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.