जिल्हा

वाघ आणि बिबटयाचा तातडीने बंदोबस्त करा… अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार !  * सामाजिक कार्यकर्तें अरविंद कात्रटवार यांचा इशारा * बिबटयाच्या हल्ल्यातील जखमींची  घेतली भेट  * जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या जिल्हा रूग्णालय प्रशासनाला दिल्या सुचना

AVB NEWS गडचिरोली :-  तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील चांभार्डा येथील चार नागरिकावर बिबटयाने हल्ला केल्याची घटना आज २५ मार्च रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांनी तातडीने रूग्णालयात धाव घेऊन जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.

मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील जंगल परिसरात वाघ व बिबटयांचा वावर आहे. चांभार्डा येथे आज बुधवारी सकाळच्या सुमारास वाघ आणि बिबटयाची झुंज झाल्याचे सांगण्यात येत आहे. या झुंजीत जखमी झालेल्या बिबटयाने अचानक एक महिलेसह चार जणांवर हल्ला केला. यामध्ये तिघांना गंभिर दुखापत झाली असून जखमी मध्ये विलास ठाकरे, रेखा मडावी, लुमाजी मुनघाटे हे गंभिर जखमी तर लिलाधर मुनघाटे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

चांभार्डा येथील नागरिक बिबटयाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळताच मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेतली. जखमींची विचारपूस करून जखमींवर योग्य ते उपचार करण्यास वैद्यकीय अधिकार्यांना सांगितले. अरविंदभाऊ कात्रटवार यांनी जखमींना आधार देत आवश्यक ती मदत केली जाईल अशी ग्वाही दिली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन जखमींना तातडीने आर्थिक मदत करावी आणि मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील वाघ आणि बिबटयाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वनविभागाला दिला आहे

 

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.