जिल्हा
माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याशी आरोग्य समस्यांवर केली चर्चा

AVB NEWS गडचिरोली: आरोग्य मंत्री . प्रकाश आंबिटकर गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, आमदार मिलिंद नरोटे यांच्या निवासस्थानी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये आणि उपकेंद्रांतील सुविधांबाबत मंत्री आंबिटकर यांच्याशी चर्चा केली. मंत्री महोदयांनी सांगितले की, जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ देवराव होळी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, शिवशेना जिल्हाप्रमुख हेमंत जंबेवार, नगरसेवक शेखर आखाडे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.