जिल्हा

एटापल्ली तालुक्यात उद्योग स्थापीत नव्या कंपनीकडून योग्य मोबदला मिळाला पाहीजे !  * पिंपली येथील शेतकऱ्यांची मागणी  *  माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- एटापल्ली तालुक्यातील पिपंली येथे नवीन उद्योग उभारणीची कार्यवाही सुरू झाली आहे. त्या अनुशंगाने पिपंली परिसरातील गावे प्रभावीत होणार असून कंपनीमुळे प्रभावीत होणार्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला, स्थानिक युवकांना योग्य पदावर रोजगाराच्या संधी, तसेस या भागातील रस्ते, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली केली आहे.
पिपंली येथे नवीन उद्योग प्रस्तावीत करण्याच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी पिपंली येथे भेट देउुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पिपली,जवेली,कुंडम,जिजावंडी,बुर्गी,वेडमागड,गणपहाडी,नैणवाडी व टोला या गावांतील नागरिकांनी नवीन कंपनीमुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला तसेच स्थानिक युवकांना प्राधान्याने योग्य पदावर रोजगाराची संधी याशिवाय रस्ते,शिक्षण व आरोग्य सुविधा बाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी  गावकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडी-अडचणी  ऐकून घेतल्या.मी तुमच्या पाठीशी सदैव आहे.जल,जंगल,जमीनीचे खरे मालक तुम्ही आहात.तसेच तुमच्या सर्व समस्या या येणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला विश्वासात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करू’ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी  प्रत्येक गावातील प्रमुख नागरिक तसेच युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.