गडचिरोली जिल्ह्यातील 24 विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षणाची संधी * लॉयड्स मेटल कंपनीचा पुढाकार

एव्हीबी न्यूज गडचिरोली:-
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमात एक ऐतिहासिक टप्पा गाठत गडचिरोली जिल्ह्यातील 24 विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. सुरजागड लोहखनिज खाणींचे पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू झाल्यानंतर, व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांच्या नेतृत्वाखाली LMEL ने औद्योगिक प्रगतीला स्थानिक युवकांसाठी जागतिक शिक्षणाच्या संधीद्वारे दीर्घकालीन सामाजिक परिणामात रूपांतरित केले आहे.
ही पुढाकार 4 मार्च 2024 रोजी ग्रामीण महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टतेशी जोडण्याच्या प्रभाकरण यांनी केलेल्या वचनपूर्तीचे प्रतीक आहे. अॅडव्हान्टेज विदर्भाच्या समारोप समारंभात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, हा कार्यक्रम गडचिरोलीतील जनतेप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदारीचे आणि दीर्घकाळ उग्रवादाने प्रभावित राहिलेल्या या भागासाठी शाश्वत भविष्य घडवण्याच्या त्यांच्या निर्धाराचे प्रतिबिंब आहे.
सध्या बॅच 1 आणि 2 मधील 10 विद्यार्थी पर्थ येथे शिक्षण घेत आहेत, तर आणखी 14 विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला असून ते लवकरच आपले अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. यशस्वी पदवीधरांना LMEL मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पदांवर नोकरीची संधी देण्यात येईल आणि पुढे ते कर्मचारी शेअर मालकी योजना (ESOP) साठी पात्र ठरतील.
कर्टिन विद्यापीठात हे विद्यार्थी अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) आणि व्यवस्थापन (मॅनेजमेंट) विषयांमध्ये शिक्षण घेत आहेत, अशी माहिती श्री. प्रभाकरण यांनी दिली. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि बी. प्रभाकरण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास प्रदान करण्यात आले. आपल्या भाषणात. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि लवकरच गडचिरोलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे उभी राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
“लॉयड्स–कर्टिन पूर्णतः प्रायोजित शैक्षणिक कार्यक्रम” अंतर्गत LMEL कडून 100 टक्के शिक्षण शुल्क, निवास व्यवस्था, राहणीमान खर्च, प्रवास तसेच प्रशासकीय खर्च वहन केला जात आहे. कंपनी दरवर्षी प्रति विद्यार्थ्यांमागे सुमारे ₹50 लाखांचा खर्च करत असून, एकूण प्रति विद्यार्थी गुंतवणूक 1.5 कोटी ते 2 कोटी इतकी आहे. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणारा हा कार्यक्रम तळागाळातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना भविष्यातील नेतृत्वासाठी सक्षम बनवण्यावर केंद्रित आहे.