अबुझमाड चकमकीत एक पोलीस जवान शहीद, एक जवान जखमी * जवानांनी 3 नक्षल्यांचा केला खात्मा, मृतकात एका महिला नक्षलीचा समावेश
एव्हीबी न्यूज गडचिरोली :- छत्तीसगड- महाराष्ट्र सिमेवरील अबुझमाड जंगलात गडचिरोली पोलीस जवान व नक्षल्यांमध्ये उडालेल्या चकमकीत जवानांनी 3 नक्षल्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत एक जखमी जवान शहीद झाला असून ता एक जवान जखमी झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
दिपक चिन्ना मडावी (38) रा.अहेरी मुळ गाव मांडरा दामरंचा असे शहीद जवानांचे नाव आहे. तर जोगा मडावी रा. क्रिश्टायापल्ली हा जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळावरून आज सकाळी आणखी दोन माओवादी (१ पुरुष व १ महिला) यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ३ माओवादी (२ पुरुष व १ महिला) यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून त्यांच्याकडून १ एके-४७ व १ एसएलआर शस्त्र जप्त करण्यात आले आहे. तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.