संतांच्या विचारातच मानवाचे कल्याण * संत तुकाराम महाराज जयंती महोत्सवात मान्यवरांचा सूर

AVB NEWS गडचिरोली: महाराष्ट्र ही संतांची भूमि आहे. या भूमिवर अनेक महान संत होऊन गेले. सर्वच संतांनी मानवी कल्याणाचाच मंत्र दिला आहे. त्यांच्या विचारातूनच मानवाचे कल्याण साध्य होऊ शकते. त्यामुळे सर्वच समाजातील व्यक्तींनी संतांचा अभ्यास करून त्यांचे विचार आचरणात आणल्यास मानवी जीवनाचा कल्याण होऊ शकते, असा सूर अखिल कुणबी समाज संघटनेच्यावतीने आयोजित संत तुकाराम महाराज जयंती महोत्सवात काढला.
येथील अखिल कुणबी समाज संघटनेच्यावतीने २ फेब्रुवारी रोजी संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी समाज संघटनेचे अध्यक्ष ॲड. संजय ठाकरे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपनिरिक्षक नितेश गोहणे, राजश्री नितेश गोहणे उपस्थित होते. सत्कारमूर्ती म्हणून गडचिरोलीच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर, उपाध्यक्ष निखील चरडे, बांधकाम सभापती अनील कुनघाडकर, महिला व बाल कल्याण सभापती सीमा कन्नमवार, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे, गटनेते सतिश विधाते, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगरसेवक प्रा. रमेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख व्यक्ते राजश्री गोहणे म्हणाल्या, संत तुकाराम महाराज यांचे विचार केवळ ऐकण्यासाठीच नाही तर त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. ज्या समाजात व ज्या काळात संत तुकाराम महाराज यांनी सर्व मानव जातीला कल्याणाचा मार्ग दाखविला, तोच मार्ग आजही मानवाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकांनी संतांच्या विचाराचे आचरण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रमुख व्यक्ते नितेश गोहणे, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर, ॲड. संजय ठाकरे आदींनी मार्गदर्शन केले. दरम्यान, गडचिरोली नगर परिषदेच्या सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल, श्रीफ ळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुणबी समाजातील इयत्ता दहावी, बारावी व शासकीय सेवेत दाखल झालेल्या युवकांचाही समाज संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धमेर्ेंद्र मुनघाटे यांनी केले. संचालन प्रा. डॉ. पंक ज नरूले व मनोज हुलके यांनी केले तर आभार राजेश गोहणे यांनी मानले.