जिल्हा

केंद्राचा अर्थसंकल्प”  सर्वांगीण विकास साधणारा – डॉ. प्रणय  खुणे

गडचिरोली :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  संसद भवनात सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू असून, या अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, आदिवासी तसेच देशातील ग्रामीण व औद्योगिक क्षेत्राला क्रांतिकारी नवसंजीवनी देणारी आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय  खुणे यांनी व्यक्त केले.

या ” सबका साथ सबका विकास” अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसोबतच पशुपालन व मत्स्यव्यवसायाला तसेच अनेक उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्यात आले असून, ग्रामीण अर्थव्यवस्था अधिकाअधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सरकारची भूमिका स्पष्ट होते. नागरिकांच्या सर्वांगीण गरिबी उत्थानासाठी केंद्र सरकार नेहमीच सकारात्मक पावले उचलत असून, यावर्षी त्यांच्यासाठी आणखी काही नवीन व प्रभावी योजना उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे संकेत या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे,
औद्योगिक विकासाच्या माध्यमातून स्टील हबच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी हा अर्थसंकल्प अतिशय महत्वाचे असून, राज्यातील नवीन औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच सामान्य नागरिकांसाठी नवीन व्यवसायाची दारे राज्यात प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यात खुली होतील,
महिला सक्षमीकरणाला अधिक बळ देणाऱ्या तरतुदी, व पायाभूत सुविधा विकासाला मिळणारी चालना आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य साधणाऱ्या उपाय योजनांमुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळेल. एकूणच हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत’ संकल्पनेचा स्वप्न साकार करणारा असून, देशाचा समतोल व परिपूर्ण सर्वसमावेशक विकास निश्चितच साधला जाईल, यात कोणतीच शंका नाही, असे स्पष्ट विचार संचालक डॉ. खुणे कन्स्ट्रक्शन अँड कंपनी व एल,एल, डोंगरवार कन्स्ट्रक्शन अँड कंपनी जिल्हा गडचिरोली व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी व्यक्त केले

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.