शिवसेना उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वाढदिवसानिमित्य विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
***************************
वाढदिवस शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत सेवाभाव दिन म्हणून साजरा
****************************
शिवसैनिकांना वस्त्रभेट, कातखेडा येथे ग्रामवासीयांना सार्वजनिक कामासाठी भांडी वाटप आणि वृक्षलागवडीचा उपक्रम
*************************************
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लढव्ये नेते तथा जनसेवा हाच मानवधर्म माणून गोरगरीबांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारे व्यक्तीमत्व अरविंदभाऊ कात्रटवार यांचा वाढदिवस काल 23 जुलै रोजी सेवाभाव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो शिवसैनिक, विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शेकडो शिवसैनिकांना ‘वस्त्रभेट’ तसेच कातखेडा येथील ग्रामवासीयांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी स्वयंपाक भांडी भेट दिली. तसेच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरचे वनचरे’ या संकल्पनेतून वृक्षलागवडीचा कार्यक्र्रम आयोजीत करण्यात आला.
शिवसेना प्रमुख हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांची वाटचाल सुरू आहे. कोणत्याही पदाची लालसा न बाळगता जनतेचा सेवक म्हणून गरजवंतांच्या मदतीला धावून जाणे व निराधारांना आधार देणे, नागरिकांच्या अडअडची सोडविणे, गावागावात जाऊन तेथील समस्या जाणून घेऊन शासन व प्रशासन दरबारी समस्यांचा पाठपुरावा करणे, समस्या सोडविण्यास भाग पाडणे असे अनेक कार्य अरविंदभाऊ कात्रटवार करीत आहेत. सेवाभावाने केलेले कार्य आणि त्यापासून मिळणारा आनंद हा अनमोल असतो, हेच ‘ब्रिद’ जोपासून त्यांची वाटचाल सुरू आहे.
अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शिवसैनिकांना आपले कुटुंब मानून शिवसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना संकट काळात आधार देण्याचे कार्य करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर असोत अथवा शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी असोत प्रत्येक गरजवंतांच्या मदतीसाठी सेवाभाव जोपासून आधार देण्याचे काम अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.
******************
जनसेवक म्हणून अहोरात्र धडपडणार..! . अरविंदभाऊ कात्रटवार
शिवसेना प्रमुख हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासून माण् उध्दवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आपली राजकीय व सामाजिक वाटचाल सुरू आहेण् शिवसेना ;उद्धव बाळासाहेब ठाकरेद्ध पक्षाने राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले आहे जनसेवेतून मिळणारा आनंद अलौकीक आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून माझे कार्य सुरू आहे त्यामध्ये माझया शिवसैनिकांचा सुध्दा मोठा हातभार आहे.मा. बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून जनतेच्या मदतीसाठी अहोरात्र धडपड करण्यास सदैव तत्पर आहे असे प्रतिपादन अरविंदभाऊ कात्रटवार यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले. वाढढिवसानिमित्य शेकडो हितचिंतक स्नेहगण व शिवसैनिकांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे काम करण्यास अधिक बळ मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली