जिल्हा
माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- शहराच्या माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांचा वाढदिवस आज 8 जुलै रोजी सेवाभाव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता ‘एक पेड मॉ के नाम’ या उपक्रमांतर्गत सोनापूर कॉम्प्लेक्स येथील गो ना मुनघाटे शाळेसमोरील ओपन स्पेस मध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे. दुपारी 12 वाजता महिला व बाल रूग्णालयात ‘माणुसकीचा घास’ या संकल्पनेतून अन्नदान कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात अभिश्टचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वरील कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले आहे.