निवेदन
प्रती,
मा. ना. देवेंद्रजी फडणविस साहेब
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा
विषय :- गडचिरोली जिल्हयात भ्रष्टाचाराचा कळस गाठलेले सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता श्री. सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून सेवेतून निलंबित करावे आणि जिल्हयातून हक्कालपट्टी करावी याबाबत ‘प्रतिकात्मक प्रेतयात्रा’ आंदोलन करण्यात येत असल्याबाबत
मार्फत :- कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोली
महोदय
मा. मुख्यमंत्री महोदय…. आपणास उपरोक्त विषयाच्या अन्वये अवगत करून देण्यात गडचिरोली जिल्हयात रस्ते व पुलाची निकृष्ट कामे करून भ्रष्टाचारात गुंतलेले सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे हे अधीक्षक अभियंता या पदावर पदोन्नती मिळवून गडचिरोली जिल्हयातच ठाण मांडून बसण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी व काही राजकीय नेत्यांचा राजाश्रय घेतल्याचे बोलले जात आहे. गडचिरोली जिल्हयात भ्रष्टाचाराचा कळस गाठलेले सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता श्री. सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून सेवेतून निलंबित करावे आणि जिल्हयातून हक्कालपट्टी करण्यात यावी कार्यकारी अभियंता श्री साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आणून कारवाईची मागणी करण्यात आली . तसेच 25 मे 2026 रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर ‘डफरे बजाओ’ आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. परंतू अद्यापही झोपी गेलेल्या शासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही. त्यामुळे 3 जून 2026 रोजी‘प्रतिकात्मक प्रेतयात्रा’ आंदोलन करण्यात येत आहे .
प्रमुख विषय आणि मागण्या
*********
१) कार्यकारी अभियंता श्री. सुरेश साखरवाडे यांनी मागील 3 वर्षात ग्रामीण भागातील रस्ते, पुल, शासकीय इमारती दुरूस्ती व विविध कामांच्या तब्बल 5000 निविदा ऑफलाईन नियबाहय पध्दतीने काढून गडचिरोली जिल्हयात भ्रष्टाचाराचा ‘कळस’ गाठला आहे. ही सर्व कामे मजूर सहकारी संस्थांना 20 टक्के कमिशन घेउुन विकण्यात आली आहेत. भ्रष्टाचाराची वाळवी ही निविदा प्रक्रिया पासून कामांची बिले काढण्यापर्यंत लागली आहे. कामांच्या 5 हजार नियबाहय निविदांचे प्रकरण हे मागील 3 वर्षातील आहे. कोणतीही कामे न करता केवळ कामे कागदावर दाखवून बिले काढण्यात आली आहेत
२) सन 2025 -26 या आर्थिक वर्षात शासनाकडून कोटयावधीचा निधी प्राप्त झाला . या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोली अंतर्गत 25 कोटीच्या पुलाच्या दुरूस्तीची कामे कामे मंजूर करण्यात आली. परंतू सदर कामांच्या खुल्या निविदा, बेरोजगार अभियंता आणि कामे नियमानुसार वाटप न करता केवळ मजूर सहकारी संस्थांना देण्यात आली आहेत. विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे मंजूर करण्यात आलेली कामे न करता व कोणतेही काम न करता कोटयावधीची बिले काढण्यात आली आहेत. तसेच अभियंता श्री. सुरेश साखरवाडे यांनी 25 कोटीच्या पुलाच्या दुरूस्तीची कामे 20 टक्के कमिशन घेऊन विकल्याचा प्रकार सुध्दा उजेडात आला आहे.
एवढेच नव्हे तर सन 2025- 26 या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोली अंतर्गत तब्बल 25 कोटींची रस्ते दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली. परंतू सदर कामांच्या खुल्या निविदा; बेरोजगार अभियंता आणि कामे नियमानुसार वाटप न करता केवळ मजूर सहकारी संस्थांना देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मंजूर करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांची दुरूस्ती न करता व कोणतेही काम न करता कोटयावधीची बिले काढण्यात आली आहेत. अभियंता श्री साखरवाडे यांच्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोली कार्यालय भ्रष्टाचाराने बोकाळले आहे
३) . अभियंता श्री. सारखरवाडे यांच्या अधिनस्त अतिदुर्गम कोरची तालुक्यातील नाडेकल ते बेतकाठी या मार्गावरील खोब्रागडी नदीवर बांधण्यात आलेला पुल रहदारी सुरू होण्यापुर्वीच कोसळला. यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणचा पर्दाफाश झाला आहे. नागरिकांनी पूल बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करून कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपध्दतीवर रोष व्यक्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपले पितळ उघडे पडून नये म्हणून पुलाचा कोसळलेला भाग लपविण्यासाठी सिमेंट क्राॅक्रीटचे अवशेष रेतीखाली दाबून ठेवण्यात आले. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात न घेता पुल बांधकामात भ्रष्टाचारच नव्हे तर नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न अभियंता श्री. साखरवाडे यांनी केला आहे.
4 ) कार्यकारी अभियंता श्री. सुरेश साखरवाडे यांचे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी चांगले वर्तन नाही. श्री. साखरवाडे हे कंत्राटदार व कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर व्यक्तीसमोर महिला कर्मचाऱ्यांना दुहेरी (लज्जास्पद) शब्दात बोलतात. शासकीय कार्यालयात वरिष्ठांकडून महिला कर्मचार्यांना असभ्य वागणूक देणे हा गुन्हा आहे. या प्रकरणाची एकादया महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करण्याची गरज आहे.
महोदय … आपण गडचिरोली जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीकोण बाळगूण जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली आहे. एकीकीडे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होऊन औद्योगीक विकासाकडे वाटचाल करीत आहे. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्हयात तब्बल 8 वर्षापासून एकाच विभागात ‘भुजंगा’ सारखे ठाण मांडून बसलेले श्री. सुरेश साखरवाडे (कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोली ) यांच्या सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे गडचिरोली जिल्हयातील पुल व रस्ते बांधकामाचा बोजवारा उडाला आहे. अभियंता श्री. साखरवाडे हे शासकीय नियम धाब्यावर बसवून ‘हम करे सो कायदा’ अशा हूकूमशाही पध्दतीने कारभार करीत आहेत. विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता श्री. सुरेश साखरवाडे हे ‘माझे कोणी वाकडे करू शकत नाही, या अर्विभावात वागत असून पदोन्नतीवर ‘अधीक्षक अभियंता’ होऊन गडचिरोली जिल्हयातच सेवा देण्याचे ‘स्वप्न’ पाहत आहे.
तसेच कार्यकारी अभियंता श्री सुरेश साखरवाडे सारखे झारीतील शुक्राचार्य शासकीय मलिंदा खात आहेत ही मोठी गंभिर बाब आहे राज्याचे मुख्यमंत्री गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री असतांना सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि जनतेचा शासन व प्रशासनाप्रती विश्वास कायम ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता श्री. सुरेश साखरवाडे यांची गडचिरोली जिल्हयातून तात्काळ हक्कालपट्टी करण्यात यावी, तसेच नाडेकल निकृष्ट पुल बांधकामात प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून कोटयाधीच्या शासकीय रक्कमेची वसूली करण्यात यावी.अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांनी तब्बल 5000 हजार ऑफलाईन निविदा नियबाहय काढून भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. त्यामुळे अभियंता श्री. सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून सेवेतून निलंबित करावे आणि जिल्हयातून हक्कालपट्टी करावी ,ही आपणास नम्र विनंती
दिनांक … 03 .06. 2026
स्थळ .. गडचिरोली
आपला विश्वासू
अरविंदभाऊ कात्रटवार
लोकनेेते गडचिरोली