निवेदन
प्रती
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणविस साहेब
मुख्यमंत्री महाराष्ट राज्य तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा
विषय सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोलीचे भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता श्री. सुरेश साखरवाडे हे कारवाईपासून सरंक्षण मिळण्यासाठी खोटे स्पष्टीकरण तथा खुलासा देउुन शासन, प्रशासन आणि जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याबाबत
संदर्भ कोरची तालुक्यातील नाडेकल निकृष्ट पुल बांधकाम, मागील तीन वर्षात विविध कामांच्या 5 हजार कामांच्या आॅफलाईन नियबाहय निविदा काढून 20 टक्के कमिशन घेउुन कामे विकणे आणि सन 2025. .26 या आर्थिक वर्षात पुल व रस्ते दुरूस्तीची 50 कोटीची कामे केल्याचे दाखवून कामे न करताच बिले काढणे या प्रकरणामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून गडचिरोली जिल्हयातून हक्कालपट्टी करण्यासाठी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आलेले निवेदन
महोदय
मा. मुख्यमंत्री महोदय उपरोक्त संदर्भान्वये आपणास यापुर्वी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता श्री. सुरेश साखरवाडे यांच्या भ्रष्टाचारी कारभाराचा भांडाफोड करून आपले लक्ष वेधण्यात आलेले आहे तसेच विविध प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाची दखल घेउुन भ्रष्टाचारी अभियंता श्री. साखरवाडे यांचे पितळ उघडे पाडले आहे. गडचिरोली जिल्हयात तब्बल 8 वर्षापासून एकाच विभागात ‘भुजंगा’ सारखे ठाण मांडून बसलेले श्री. सुरेश साखरवाडे (कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 गडचिरोली ) यांच्या सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे गडचिरोली जिल्हयातील पुल व रस्ते बांधकामाचा बोजवारा उडाला आहे. अभियंता श्री. साखरवाडे हे शासकीय नियम धाब्यावर बसवून ‘हम करे सो कायदा’ अशा हूकूमशाही पध्दतीने कारभार करीत आहेत. विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता श्री. सुरेश साखरवाडे हे ‘माझे कोणी वाकडे करू शकत नाही, या अर्विभावात वागत असून पदोन्नतीवर ‘अधीक्षक अभियंता’ होऊन गडचिरोली जिल्हयातच सेवा देण्याचे ‘स्वप्न’ पाहत आहे. अभियंता श्री. साखरवाडे यांच्या भ्रष्टाचारी प्रकरणांचा भांडाफोड केल्यामुळे आता कारवाईच्या भितीपोटी खोटे स्पष्टीकरण व खुलासा देऊन शासन, प्रशासन आणि जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.